Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक…

Live Updates

Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीचे सर्व अपडेट्स

22:55 (IST) 17 Sep 2024
वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचं विसर्जन, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

"गेली १० दिवस सर्व लोकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राज्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. आता गणपती बाप्पााला निरोप देताना गणपती बाप्पा पुन्हा लवकर या, अशी भावना सर्वांचीच असते. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाचा महाराष्ट्राच्या जनतेवर आशीर्वाद राहवा", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. तसेच यावेळी वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आले.

21:44 (IST) 17 Sep 2024
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. पुण्यात वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता होत असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ४ वाजेपासून सुरु होती.

20:52 (IST) 17 Sep 2024
Pune Ganesh Visarjan: वीर हनुमान मित्र मंडळाने साकारला आरोग्य दूत रथ

समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या आरोग्य सेवकांना वीर हनुमान मित्र मंडळाने मानाचा मुजरा करत आरोग्य दूत रथ साकारला आहे.

20:32 (IST) 17 Sep 2024
इंदापूरमध्ये विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नदीत बुडाला

गणेश विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नीरा नदीत बुडाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर गावात घडली.

सविस्तर वाचा...

20:32 (IST) 17 Sep 2024
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी

राज्यात गेल्या १० दिवसांपासून भक्तिमय वातावरण करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली आहे.

19:57 (IST) 17 Sep 2024
Pune Ganesh Visarjan:विसर्जन मिरवणुकीत आदेश धुडकावून घातक लेझर झोत आणि ध्वनीवर्धकाचा वापर

विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला होता.

सविस्तर वाचा...

19:45 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates : आदिशक्ती रथात विराजमान, अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन

आरती संपन्न झाल्यानंतर शारदा गजाननाची मूर्ती रथावर ठेवण्यात आली आहे.

19:37 (IST) 17 Sep 2024
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

गेल्या १० दिवसांपासून राज्यात भक्तिमय वातावरण करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधील गिरगाव चौपाटीमध्ये गणपतींचं विसर्जन करण्यासाठी दाखल झाले आहेत.

18:50 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: पुण्यात मानाच्या तीन गणपतींचं विसर्जन

पुण्यातील पाच मनाच्या गणपतींपैकी तीन गणपतींचं विसर्जन वाजत-गाजत संपन्न झालं आहे.

18:49 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: पुण्यात गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन

पुण्यातील गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन संपन्न...

18:40 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

गणपती बाप्पांना एवढंच मागणं आहे की ते विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांची विघ्नं दूर करावीत. ते बुद्धीची देवता आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी. आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांनाही सुबुद्धी द्यावी - देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा...

18:25 (IST) 17 Sep 2024
नांदेडमधील नगीना घाट येथे भाविकांनी गणपती बाप्पाला दिला निरोप

नांदेडमधील गोदावरी नदीच्या नाभीस्थानी नगीना घाट येथे 'गणपती बाप्पा मोरया', 'मंगलमूर्ती मोरया', 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी आर्जव करत भाविकांनी गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी अवघा गोदाघाट भक्तिमय वातावरणात दंग झाला होता.

छायाचित्र : विजय होकर्णे नांदेड

18:06 (IST) 17 Sep 2024
गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील मध्यवर्ती भागात आवाजाची पातळी अधिक

गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील मध्यवर्ती भागात आवाजाची पातळी अधिक तर उपनगरी भागात ती कमी असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत समोर आले. औंधमधील परिहार चौकात आवाजाची पातळी ७० डेसिबिलपेक्षा कमी नोंदविण्यात आली तर डेक्कन येथील फुलाचीवाडी परिसरात आवाजाची पातळी ९० डेसिबलपेक्षा जास्त नोंदविण्यात आली.

17:43 (IST) 17 Sep 2024
"तुला आंदेकरच्या ऑफिसला नेऊन दाखवते मी कोण आहे ते", महिला पोलिसांना विक्रेत्या महिलेने दिली धमकी

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्हिआयपी लोक दर्शनासाठी भेट देणार असल्याचे पदपथावर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिलांनी महिला पोलिसांना धक्काबुकी केली. सविस्तर वाचा

17:32 (IST) 17 Sep 2024
Ganpati Visrajan : बेलबाग चौकातून दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ

बेलबाग चौकातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. लक्ष्मी रस्त्यावरून आता ही मिरवणूक पुढे जाईल. एरव्ही रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे दगडूशेठ गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर दाखल होते. मात्र, मंडळाने ठरवल्याप्रमाणे मिरवणूक यंदा दुपारीच मिरवणूक मार्गावर दाखल झाली आहे. दगडूशेठ गणपतीचा मिरवणूक रथ हे कायमच भाविकांचे आकर्षण असते. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रसन्न मूर्तीला वंदन करण्यासाठी अनेक भाविक हात जोडून मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहतात.

17:04 (IST) 17 Sep 2024
Ganpati Visrajan : गर्दी आणि उन्हामुळे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना त्रास; पहिल्या चार तासांत १२२ जणांवर उपचार

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था विघ्नहर्ता न्यासतर्फे करण्यात आली आहे. ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 17 Sep 2024
Pune Ganesh Visarjan 2024 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ४.३५ वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ४.३५ वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ

16:22 (IST) 17 Sep 2024
Ganpati Immersion in Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीतील आरोग्य रथ बेलबाग चौकात दाखल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीतील आरोग्य रथ बेलबाग चौकात दाखल

16:20 (IST) 17 Sep 2024
Ganpati Visarjan : धुळे जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापडल्याने तीन बालकांचा मृत्यू

सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असताना धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरखाली सापडल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला. सविस्तर वाचा

16:17 (IST) 17 Sep 2024
Ganpati Immersion in Pune : मानाच्या पहिला कसबा गणपतीचे विसर्जन

ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन झाले. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार घोष झाला. कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून निघाली.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: अजित पवारांचं गणेश भक्तांना आवाहन

मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन केलं आहे. तसं झालं आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं. नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचं पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. पण नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधनं पाळावीत – अजित पवारांचं आवाहन

15:53 (IST) 17 Sep 2024
Pune Ganesh Visarjan 2024 Live : :मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ लक्ष्मी रस्त्यावर दाखल

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ लक्ष्मी रस्त्यावर दाखल

15:15 (IST) 17 Sep 2024
Mumbai Ganesh Visarjan 2024 Live: नऱ्हेपार्कचा राजावर फुलांसोबतच भंडाऱ्याची उधळण

नऱ्हेपार्कचा राजा श्रॉफ बिल्डिंगजवळ येताच फुलांसोबतच भंडाऱ्याचीही उधळण करण्यात आली. खंडोबाच्या रुपातल्या बाप्पासमोर भाविकांनी यावेळी भक्तिभावाने नमन केलं.

15:14 (IST) 17 Sep 2024
Mumbai Ganesh Visarjan 2024 Live: लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून फुलांची उधळण

सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून फुलांची उधळण करण्यात आली.

14:44 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

गणरायाला निरोप देण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा म्हणजे दुपारी १२ वाजता उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीत मानाच्या मंडळासह २० पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग  आहे.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 17 Sep 2024
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी

कल्याण मधील वाडेकर भागात गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीयांच्या एका टोळीने घरातील दोन लाख 40 हजाराचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. घरातून बाहेर पडताना या टोळीने घरमालकांकडून भिक्षा म्हणून दोनशे रुपये मागून घेतले.

सविस्तर वाचा

13:40 (IST) 17 Sep 2024
मद्यधुंद मोटार चालकाची चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला धडक; पाटील अपघातातून बचावले

कल्याणी नगर अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात मद्यधुंद मोटर चालकाकडून अपघाताचा आणखी एक प्रकार घडला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला मद्यधुंद  मोटरचालकाने  धडक दिली. सविस्तर वाचा

12:55 (IST) 17 Sep 2024
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर दाखल.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर आला असून, त्या पुढील पथकेही लक्षवेधक आहेत. मानाच्या गणपतींना पुण्यात खूप महत्त्व आहे. मानाचे पाच गणपती आणि त्यांची मिरवणूक प्रेक्षणीय असते. दरवर्षी पुणेकर हे गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात.

12:10 (IST) 17 Sep 2024
Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल

मुंबई : चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर  अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे. सविस्तर वाचा

11:51 (IST) 17 Sep 2024
गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला दिमाखदार प्रारंभ; गणेशभक्तांनी गर्दी

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला दिमाखदार प्रारंभ झाला. प्रथेनुसार महात्या फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुप्षहार अर्पण करून ठीक साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या सुरेल सुरावटी, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्तावर आली. चौका- चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावटीसह रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

Nashik Municipal Corporation collected 1707 Ganesha idols in five days nashik

पाच दिवसांत १७०७ गणेश मूर्ती संकलित; नाशिक महापालिकेचा मूर्ती दान उपक्रम ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Story img Loader