Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक…
Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीचे सर्व अपडेट्स
“गेली १० दिवस सर्व लोकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राज्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. आता गणपती बाप्पााला निरोप देताना गणपती बाप्पा पुन्हा लवकर या, अशी भावना सर्वांचीच असते. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाचा महाराष्ट्राच्या जनतेवर आशीर्वाद राहवा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. तसेच यावेळी वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. पुण्यात वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता होत असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ४ वाजेपासून सुरु होती.
समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या आरोग्य सेवकांना वीर हनुमान मित्र मंडळाने मानाचा मुजरा करत आरोग्य दूत रथ साकारला आहे.
गणेश विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नीरा नदीत बुडाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर गावात घडली.
राज्यात गेल्या १० दिवसांपासून भक्तिमय वातावरण करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली आहे.
विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला होता.
आरती संपन्न झाल्यानंतर शारदा गजाननाची मूर्ती रथावर ठेवण्यात आली आहे.
गेल्या १० दिवसांपासून राज्यात भक्तिमय वातावरण करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधील गिरगाव चौपाटीमध्ये गणपतींचं विसर्जन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
पुण्यातील पाच मनाच्या गणपतींपैकी तीन गणपतींचं विसर्जन वाजत-गाजत संपन्न झालं आहे.
पुण्यातील गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन संपन्न…
गणपती बाप्पांना एवढंच मागणं आहे की ते विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांची विघ्नं दूर करावीत. ते बुद्धीची देवता आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी. आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांनाही सुबुद्धी द्यावी – देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा…
नांदेडमधील गोदावरी नदीच्या नाभीस्थानी नगीना घाट येथे ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्जव करत भाविकांनी गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी अवघा गोदाघाट भक्तिमय वातावरणात दंग झाला होता.
छायाचित्र : विजय होकर्णे नांदेड
गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील मध्यवर्ती भागात आवाजाची पातळी अधिक तर उपनगरी भागात ती कमी असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत समोर आले. औंधमधील परिहार चौकात आवाजाची पातळी ७० डेसिबिलपेक्षा कमी नोंदविण्यात आली तर डेक्कन येथील फुलाचीवाडी परिसरात आवाजाची पातळी ९० डेसिबलपेक्षा जास्त नोंदविण्यात आली.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्हिआयपी लोक दर्शनासाठी भेट देणार असल्याचे पदपथावर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिलांनी महिला पोलिसांना धक्काबुकी केली. सविस्तर वाचा
बेलबाग चौकातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. लक्ष्मी रस्त्यावरून आता ही मिरवणूक पुढे जाईल. एरव्ही रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे दगडूशेठ गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर दाखल होते. मात्र, मंडळाने ठरवल्याप्रमाणे मिरवणूक यंदा दुपारीच मिरवणूक मार्गावर दाखल झाली आहे. दगडूशेठ गणपतीचा मिरवणूक रथ हे कायमच भाविकांचे आकर्षण असते. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रसन्न मूर्तीला वंदन करण्यासाठी अनेक भाविक हात जोडून मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहतात.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था विघ्नहर्ता न्यासतर्फे करण्यात आली आहे. ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ४.३५ वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीतील आरोग्य रथ बेलबाग चौकात दाखल
सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असताना धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरखाली सापडल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला. सविस्तर वाचा
ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन झाले. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार घोष झाला. कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून निघाली.
मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन केलं आहे. तसं झालं आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं. नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचं पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. पण नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधनं पाळावीत – अजित पवारांचं आवाहन
मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ लक्ष्मी रस्त्यावर दाखल
नऱ्हेपार्कचा राजा श्रॉफ बिल्डिंगजवळ येताच फुलांसोबतच भंडाऱ्याचीही उधळण करण्यात आली. खंडोबाच्या रुपातल्या बाप्पासमोर भाविकांनी यावेळी भक्तिभावाने नमन केलं.
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगवरून फुलांची उधळण करण्यात आली.
गणरायाला निरोप देण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा म्हणजे दुपारी १२ वाजता उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीत मानाच्या मंडळासह २० पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग आहे.
कल्याण मधील वाडेकर भागात गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीयांच्या एका टोळीने घरातील दोन लाख 40 हजाराचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. घरातून बाहेर पडताना या टोळीने घरमालकांकडून भिक्षा म्हणून दोनशे रुपये मागून घेतले.
कल्याणी नगर अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात मद्यधुंद मोटर चालकाकडून अपघाताचा आणखी एक प्रकार घडला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला मद्यधुंद मोटरचालकाने धडक दिली. सविस्तर वाचा
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर आला असून, त्या पुढील पथकेही लक्षवेधक आहेत. मानाच्या गणपतींना पुण्यात खूप महत्त्व आहे. मानाचे पाच गणपती आणि त्यांची मिरवणूक प्रेक्षणीय असते. दरवर्षी पुणेकर हे गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात.
मुंबई : चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे. सविस्तर वाचा
पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला दिमाखदार प्रारंभ झाला. प्रथेनुसार महात्या फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुप्षहार अर्पण करून ठीक साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या सुरेल सुरावटी, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्तावर आली. चौका- चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावटीसह रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा