Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक…

Live Updates

Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीचे सर्व अपडेट्स

11:45 (IST) 17 Sep 2024
गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी  सकाळी ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये ४७०८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाने काल (१६ सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले होते. सविस्तर वाचा

11:44 (IST) 17 Sep 2024
Ganesh Immersion 2024 Arrangements : दादर, वरळी भागांत कोणते रस्ते बंद, कोणते सुरू

गोविंदजी केणी मार्ग-माने मास्तर चीक (भोईवाडा नाका) ते हिंदमाता जंक्शन दरम्यानचा मार्ग बंद राहिल. पर्यायी मार्ग -सदर मार्गावरील वाहतूक जी डी आंबेकर मार्गाने शंकरराव घाडगे मास्तर चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने बी जे देवरूखकर मार्गावर वळविण्यात येईल. सविस्तर वाचा

11:17 (IST) 17 Sep 2024
यावर्षीही ठाण्यात ढोलाताशांविना विसर्जन मिरवणुकांचा थाट

ठाणे : ढोला-ताशा, बँजो, ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्याचा निर्णय ठाण्यातील काही सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. गुलालाऐवजी फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातील.

सविस्तर वाचा

10:52 (IST) 17 Sep 2024
ganpati Visarjan 2024 : ठाणे, कल्याण, भिवंडीत वाहतुक बदल

ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी शहरात शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.ठाणे शहरातील साकेत, कळवा, विटावा येथून सिडको किंवा स्थानक परिसराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कळवा खाडी पुल तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंदी असेल.

सविस्तर वाचा

10:38 (IST) 17 Sep 2024
lalbaugcha Raja ganpati visrajan live updates: लालबागचा राजाची मूर्ती जागेवरून हलवली

लालबागचा राजा गणेश मूर्ती जागेवरून हलवण्यात आली असून थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

10:36 (IST) 17 Sep 2024
Mumbai Ganesh Visarjan 2024 Live: तेजुकाया गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.

10:35 (IST) 17 Sep 2024
lalbaugcha Raja ganpati visrajan live updates: सकाळी लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक निघणार

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी११ वाजता सुरुवात होणार असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे.

10:27 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: पण्यातील पहिला कसबा गणपती मार्गस्थ

पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार पुण्यात सर्वात आधी कसबा गणपतीचं विसर्जन केलं जातं. त्यानंतर पुण्यातील इतर गणेश मंडळांमधील मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात होते.

10:26 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: पुण्या-मुंबईत गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात

मुंबई व पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे…

10:25 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live Updates: मंबईत विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव

मुंबईत विसर्जनाच्या सुविधेसाठी २०४ कृत्रिम तलावांची व्यवस्था मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आली असून त्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा गणेशभक्तांना पुरवण्यात आल्या आहेत.

09:27 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: अजित पवारांचं गणरायाला साकडं…

सगळीकडे सुख, समाधान, शांती राहू दे, हेच साकडं बाप्पाला घातलं आहे – अजित पवार</p>

08:37 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: अजित पवारांचं गणेश भक्तांना आवाहन

मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन केलं आहे. तसं झालं आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं. नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचं पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. पण नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधनं पाळावीत – अजित पवारांचं आवाहन

08:17 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

गणपती विसर्जनासाठी एकूण ६८ विसर्जन घाट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ३७ ठिकाणे डोंबिवलीत, कल्याणमध्ये २७ आहेत.

वाचा सविस्तर

08:17 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: ठाणेकरांचा पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद

तलावांसह विशेष टाकी आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेंतर्गत गणेशमुर्तीचे विसर्जन करत ठाणेकरांनी पालिकेच्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले.

वाचा सविस्तर

08:15 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live: मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

मुंबईतील आकर्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र ठरलेला ‘मुंबईचा राजा’ विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे.

08:13 (IST) 17 Sep 2024
Maharashtra Mumbai Ganesh Visarjan 2024 Live updates: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने सोमवारी मध्यरात्री पासून मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

08:11 (IST) 17 Sep 2024
Ganesh Visarjan 2024 Live: मुंबई : अनंत चतुर्दशीला वीस हजारांहून अधिक पोलिसांचा शहरभर बंदोबस्त

अत्यावश्यक वस्तू सोडून इतर वस्तू घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये प्रवेश करण्यास व रस्त्यावर धावण्यास अनंत चतुर्दशीला सकाळी ११.०० ते दुस-या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत. विसर्जन मिरवणूक जुन्या तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील घाटकोपर रेल ओव्हर पूल, करीरोड रेल ओव्हर पूल, चिंचपोकळी रेल ओव्हर पूल, भायखळा रेल ओव्हर पूल, मरिन लाईन्स रेल ओव्हर पूल, सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर पूल, फ्रेंच रेल ओव्हर पूल, केनडी रेल ओव्हर पूल, फॉकलन्ड रेल ओव्हर पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक रेल ओव्हर पूल आदी पुलांचा यात समावेश आहे

छेडछाड रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणीध्या वेशातील पोलिस असणार आहेत. त्याच बरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १० कंपनी, १५ अतिरिक्त प्लाटून, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनासाठी लालबागचा राजाच्या मार्गिकेवर पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

08:10 (IST) 17 Sep 2024

१७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर या दोन दिवशी शहरात ९ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४ हजार पोलीस निरीक्षकांसह २०,५१० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशिल ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

गणपती विसर्जन व ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी सुमारे २० हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.

08:09 (IST) 17 Sep 2024

अनंत चतुर्दशीला शहरातील कायदा आणि सूव्यवस्था राखण्यासाठी २० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहतूक विभागाचे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. लालबाग गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

अनंत चतुर्दशीला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर

पाच दिवसांत १७०७ गणेश मूर्ती संकलित; नाशिक महापालिकेचा मूर्ती दान उपक्रम ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Ganesh Visarjan 2024 Live, 17 September 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा