लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मंगळवारी होत असलेल्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून विजर्सन मिरवणुकीच्या मार्गावर दहा स्वागत कमानी उभारल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्ग कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा फलकांनी झाकोळला गेला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

sharad pawar sambhaji bhide
Sharad Pawar Gets Angry: “संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का?” शरद पवारांचा संतप्त सवाल; म्हणाले, “दर्जा फार…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
anesh visarjan and paigambar jayanti miraj
सांगली : मिरजेत पैगंबर जयंतीची मिरवणूक लांबणीवर, गणेशोत्सव – पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने निर्णय
Satej Patil
राज्यात तिसऱ्या आघाडीचे भवितव्य कठीण; सतेज पाटील
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Singletoli, person attacked, weapon,
गोंदिया : सिंगलटोली संकुलात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
Sexual assault with 10-year-old minor girl in Nalasopara two people arrested
नालासोपाऱ्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक
Badlapur, Suspension, headmistress,
बदलापूर : मुलींच्या अत्याचाराप्रकरणी मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, शाळेचा माफीनामा

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक एकाच मार्गाने जात असल्याने आणि वेगवेगळे देखावे, अन्य राज्यातील पारंपरिक नृत्य प्रकार पाहण्यास मिळत असल्याने मिरज शहरातील विसर्जन मिरवणूक हे गणेश भक्तांचे आकर्षण ठरले आहे. पन्नास फुटी उंचीच्या भव्यदिव्य स्वागत कमानी हेसुध्दा या मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानले जाते.

आणखी वाचा-आगामी २५ वर्षे अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील

रेल्वे स्टेशन रोडवर संभाजी महाराज तरुण मंडळाने उभारलेल्या स्वागत मिरवणुकीवर मातापित्यांना कावडीतून काशीयात्रेला घेऊन निघालेल्या गणेशाचे चित्र असून हिंदू एकता आंदोलनाच्या स्वागत कमानीवर जगन्नाथ पुरीच्या मंदिराचे छायाचित्र रंगविण्यात आले आहे. याशिवाय आसनस्थ गणेशाचे चित्र मराठा महासंघाच्या कमानीवर रेखाटले आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना शिंदे-गट, शिवसेना उबाठा-गट, विश्वशांती मंडळ आदींसह दहा कमानी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिका, जनसुराज्य शक्ती यांनी स्वागत कक्षही उभारले आहेत.

आणखी वाचा-साताऱ्यात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोचर यांच्यासह चार उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ७१ पोलीस उपनिरीक्षक, ५४५ पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे ११३ जवान, फिरती पथके ८ तैनात करण्यात आली असल्याची माहिती उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सोमवारी दिली. महापालिकेनेही गणेश तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी तयारी केली असून या ठिकाणी भोई समाजाचे तरुण मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मूर्तिदानाची व्यवस्थाही करण्यात आली असून शहरात अन्य आठ ठिकाणी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी किमान दोन ठिकाणी विसर्जन करता येईल, अशी व्यवस्था गणेश तलावाच्या ठिकाणी करण्यात आली आहे.