सावंतवाडी : कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या सालईवाड्याच्या राजाचे गुरूवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. यंदा ११९ वं वर्ष असून २१ दिवस मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत रात्री गणरायाचं आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहरानं प्रतिसाद दिला. गेल्या ११८ वर्षापासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदा मंडळाच ११९ व वर्ष आहे. चतुर्थी पासून पुढील २१ दिवस जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. तेव्हा या आवाहनाला कोकणातून पहिल्यांदा प्रतिसाद सावंतवाडी शहरानं दिला. सावंतवाडीतील सालईवाडा येथे सन. १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सितारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली. गुरूवारी रात्री ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत या मंडळाच्या गणरायाचं आगमन करण्यात आले. चतुर्थी पासून पुढील २१ दिवस विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha arrival at salaiwada in konkan sawantwadi ganeshotsav 2024 amy