पंढरपूर : ज्या पंढरी नगरीत टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष होतो अशा नगरीत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि पारंपरिक पद्धतीने गणपतीचे स्वागत करण्यात आले. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती घेण्यासाठी कुंभार गल्ली आणि बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. पावसाने विश्रांती घेतली असल्याने भाविकांच्या गर्दीने बाजापेठ फुलून गेल्या आहेत. येथील श्री विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा शहरात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजोपयोगी तसेच विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

१४ विद्या, ६४ कलांचा अधिपती श्री गणराय. या गणपतीचे आगमन पारंपरिक आणि मोठ्या उत्साहात झाले. गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरयाच्या गजरात लहान मोठ्या गणेशाची स्थापना झाली. गेली दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते. येथील कुंभार गल्लीत गणेशाच्या आकर्षक मूर्ती खरेदीसाठी लगबग दिसून आली. सकाळी घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली. त्या नंतर शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात गणपती पूजन केले. शहरात यंदा अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. येथील श्री विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने गणेशाची स्थापना मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

हेही वाचा – जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

हेही वाचा – सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत, शहरात १३५० मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना

गणेश उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गुन्हेगारी लोकांची यादी बनवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर तात्पुरती हद्दपारी, स्थानबद्धता करण्यात येत आहे. तसेच गणेश मंडळांनी आवाज मर्यादेचे पालन काटेकोरपणे करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी सांगितले. असे असले तरी लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहत करण्यात आले.