सातारा : गणेशोत्सवासाठी कोकणात आणि देशावर निघालेल्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे शुक्रवारी पुणे बंगळुरू महामार्ग आणि खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या तसेच यामुळे होत वाहतूक विस्कळित झाली होती. तसेच या गर्दीमुळे आनेवाडी टोलनाक्यावरही वाहनांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
उद्याशनिवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने तसेच शनिवार – रविवार जोडून सुट्टी असल्याने अनेक भाविक आपल्या गावाकडे कोकणात व देशावर सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगावकडे जात आहेत. याशिवाय मुंबई – गोवा महामार्गावर अनेक ठिकामी खड्डे, मोठी गर्दी असल्याने अनेक मुंबईकरांनी पुणे बंगळुरू महामार्गावरून कोकणात जाणे पंसत केले आहे. यामुळे या महामार्गावर वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. यातच खांबाटकी घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या पहिल्याच वळणावर शुक्रवारी एक कंटेनर व ट्रक बंद पडल्याने वाहतूक मोट्या प्रमाणात विस्कळीत झाली.