कोकणातून गुंडांचा सुपडासाफ करायचा आहे विसरु नका. मोदींनी जसा झाडू घेऊन चकचकीत फरशी स्वच्छ केली ना? तशी लोकसभेत इथली घाण साफ करायची आहे हे विसरु नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला ते बाहेर आलं कसं बाहेर आलं? कुणी मागितलं होतं? कुणीच नाही. लबाडाने शिवसेना मिंध्यांची आहे यासाठी फुटेज यांना दिसलं नाही असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज कसं बाहेर आलं ?

“गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला ते त्यांनी मान्यच केलं की गोळ्या घातल्या. तरीही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. मी गणपत गायकवाड यांची बाजू घ्यायला मुळीच सवांतवाडीत आलो नाही. पण गणपत गायकवाड म्हणाले मिंधे राज्याचा मुख्यमंत्री असेल तर राज्यात गुंडांची पैदास होईल. मिंधेंनी मला गुंड बनवलं कारण पोलीस ठाण्याच्या आवारात मुलाला मारहाण झाली तेव्हा बाप म्हणून गोळीबार केला असं ते म्हणाले आहेत. याची चौकशी होणार आहे की नाही? तसंच त्यांनी म्हटलंय मिंधेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. पण आरोपानंतर कारवाई होईल का? आता मोदी गँरंटी कुणाला पावणार? ते बघू” असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’च्या घोषणा देत होते तेव्हा टरबूज होते, आता पार…”, उद्धव ठाकरेंचा टोला

सरकारमध्येच गँगवॉर सुरु झालंय

“मी खोटारड्यांचा आणि हुकमशाहीचा विरोधक आहे. आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा काहीतरी चांगलं होईल वाटलं होतं. सरकार म्हणजे काय चाललंय? आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबईत गँगवॉर फोफावलं होतं. रेल्वे स्टेशन असो किंवा इतरं ठिकाणं कुणीही कुणाला गोळ्या घालत. अनेकदा दिवसाही बातमी यायची. आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं. आता दुर्दैव असं आहे की या सरकारमध्येच गँगवॉर सुरु झालंय. एक मिंधेंची गँग, एक भाजपाची गँग, तिसरी गँग दिसतच नाही, पण ती आहे कारण ती ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात अडकली आहे. त्यामुळे त्या गँगला डोकं वर काढता येत नाही. हे गँगवॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मोदीजींना सांगायचं आहे की तुम्ही भाजपाच संपवला आहात.” अशा पद्धतीने सावंतवाडीच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी टीकेची तोफ डागली आहे.

Story img Loader