सांगली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली पोलीसांनी विविध ठिकाणी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये १७ जिवंत काडतुसासह देशी बनावटीची सात पिस्तुले, बाराशे ग्रॅम गांजा, २२८ नशेच्या गोळ्या असा ९ लाख ६७ हजाराचा ऐवज जप्त करीत सहा आरोपींना गजाआड केले. शनिवारी रात्री पोलीसांच्या दोन पथकांनी सांगली, मिरज शहरात एकाचवेळी झाडाझडतीची मोहिम राबवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी दिली.

जिल्ह्याच्या मिरज व जत तालुययाच्या सीमा कर्नाटक लगत असल्याने या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संशयितांची झाडाझडती घेण्याचे आदेश अधिक्षक बसवराज तेली यांनी दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सहायक निरीक्षक संदीप शिंदे व प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तैनात करण्यात आली होती.

vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
two man try to kill youth in pune arrested in two hours
खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी दोन तासात जेरबंद
One killed on suspicion of theft four arrested
ठाणे : चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, चौघांना अटक
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी

आणखी वाचा-‘ओटीपी-पासवर्ड’ दिला नाही, तरी गमावले सव्‍वा लाख रुपये

या दोन पथकानी सांगली शहर, विश्रामबाग, महात्मा गांधी चौक आणि मिरज शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयित आरोपींची झाडाझडती घेतली. यावेळी सांगलीमध्ये शांताराम शिंदे, सौरभ कुकडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राहूल माने, मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वैभव आवळे व सुरेश राठोड आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सूरज महापुरे या सहा जणांना अटक केली.

या सर्वाकडून सात देशी बनावटीची पिस्तुले आणि १७ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तर राहूल माने याच्याकडून १ हजार २१८ गॅ्रम वाळलेला गांजा आणि नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या निट्रावेट-१० आणि निट्रोसम आर-१० या कंपनीच्या २२८ गोळ्या आढळल्या आहेत. गांजा व गोळयांची तो विक्री करीत असतानाच पोलीसांनी त्याला रंगेहात अटक केली. तर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी स्विप्ट डिझायर ही मोटारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांना अटक करून पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.