दापोली : खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुवीर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण कुदंन भोरे (वय ४०) मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता.जि. सातारा. सध्या रा. आझाद चौक, लक्ष्मी नगर ता. कोरेगाव जि. सातारा, उज्वला बाळकृष्ण मेकले (वय-३६) वर्षे मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता. जि. सातारा सध्या रा. आकाश वाणी समोर ता. जि. सातारा व अविनाश हरीश्चंद्र मोरे (वय ४५) वर्षे रा. उचाट ता. महाबळेश्वर जि. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
गांजा या अंमली पदार्थासह पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पियो गाडी, तसेच १ लाख २५ हजार रुपये किंमतीची एक निळ्या काळ्या रंगाची यामाहा कंपनीची मॉडेलची स्कुटी तसेच ३१ हजार १९७ रुपये किंमतीचा एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवी मध्ये असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र दर्प / वास असलेला एकूण २ किलो ८४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.