कोकणातील परंपरेला अनुसरून काल गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे घरोघरी मोठय़ा भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत कोकणात या उत्सवाचे वेगळे माहात्म्य असून येथे सार्वजनिक उत्सवापेक्षा घराघरांमध्ये कौटुंबिक पातळीवर बाप्पांची मोठय़ा भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना केली जाते. रत्नागिरी जिल्ह्य़ात काल अशा प्रकारे सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली असून संपूर्ण जिल्’ातील सार्वजनिक गणपती मंडळांची संख्या जेमतेम १०९ आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी काल सकाळपासूनच जिल्’ाातील गणेश चित्रशाळांमध्ये गर्दी उसळली होती.  रत्नागिरी शहराजवळच्या कर्ला-आंबेशेत येथील ग्रामस्थांनी काढलेली श्रीगणेश आगमन मिरवणूक दरवर्षांप्रमाणेच लक्षवेधी ठरली. गेली सुमारे तीन दशके ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध रीतीने, राजकारणविरहित आणि जल्लोषपूर्ण वातावरणात काढली जाते.  वर्षभरातील या सर्वात महत्त्वाच्या उत्सवासाठी राज्याच्या निरनिराळ्या भागांमधून, विशेषत: मुंबई-ठाणे परिसरातून चाकरमानी गेल्या शनिवारपासूनच हजारोंच्या संख्येने कोकणात दाखल होऊ लागले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेवर मोठा ताण पडला. महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार घडले. पण पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून वाहतूक सुरळीत चालू ठेवली. लांज्याजवळ आंजणारी घाटात गेल्या रविवारी पहाटे झालेला अपघातवगळता कुठेही मोठी दुर्घटना घडली नाही. कोकण रेल्वेने मुंबईहून जादा गाडय़ांची मोठय़ा प्रमाणात व्यवस्था करून रस्त्यावरच्या वाहतुकीचा भार लक्षणीय प्रमाणात हलका केला. त्याचबरोबर सध्या कोकणात सर्वत्र चांगली उघडीप असल्यामुळे उत्सवाचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेणे शक्य झाले आहे.

कोकणात बहुसंख्य घरांमध्ये गौरी-गणपतीचे एकत्र पूजन आणि सहाव्या किंवा सातव्या दिवशी विसर्जन होते. पण काही कुटुंबांमध्ये परंपरेनुसार दीड दिवसाचा गणपती असतो. अशा गणपतींचे आज संध्याकाळी विधिवत विसर्जन झाले. अन्य ठिकाणी मात्र या आठवडाअखेपर्यंत हा भक्तीमय सोहळा चालणार आहे.