Gautam Adani BJP-NCP Alliance Talks Ajit Pawar Reveals : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार अल्पावधित कोसळलं. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच तो शपथविधी झाला होता, असा खुलासा नंतर अजित पवारांनी केला. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युतीसाठी मोठ्या उद्योगपतीच्या घरात ही चर्चा झाली होती, असंही अजित पवार म्हणाले होते. हा मोठा उद्योगपती कोण, याबाबत अजित पवारांनी आज अधिकृत माहिती दिली आहे. न्यूज लॉन्ड्री या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वादळ निर्माण झालं. या मुळे या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली. जनतेने संपूर्ण बहुमत या युतीला दिलेलं असतानाही त्यांनी सरकार स्थापनेसाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची प्रतिष्ठेची ठरवली. दरम्यान, यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात युती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अन् अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय खेळीमुळे संपूर्ण राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, शरद पवारांनी या युतीला पाठिंबा न दिल्याने अवघ्या ८० तासांत हे सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. परंतु, २०१९ मध्ये अजित पवारांनी भाजपाची साथ का दिली? त्यांना शरद पवारांचा पाठिंबा होता का? असे प्रश्न आजही राजकीय वर्तुळात उपस्थित केले जातात.

mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Image Of PM Narendra Modi, Home Minister Amit Shah An Former CM Uddhav Thackeray
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

हेही वाचा >> Uddhav Thackeray : “तुमचं नियुक्ती पत्रक दाखवा, पाकिटातील पैसे दाखवा”, सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरेंनी घेतलं फैलावर!

दिल्लीत मोठ्या उद्योगपतीच्या घरात बैठक झाली

याबाबत त्यांनी याआधीही खुलासा केला होता की, या नव्या राजकीय समीकरणासाठी शरद पवारांचा पाठिंबा होता. याबाबत एका मोठ्या उद्योपगतीच्या घरी चर्चाही झाली होती. परंतु, कोणत्या उद्योगपतीच्या घरात चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात होतं. आता त्या उद्योगपतीचं नावही समोर आलं आहे. अजित पवार म्हणाले, “आमचे वरिष्ठ नेते जसं सांगतात तसं आम्ही करतो. २०१९ च्या घटनेला आता ५ वर्षे झाली. सर्वांना माहितेय कुठे मीटिंग झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरात मीटिंग झाली. पण आता जे झालं ते झालं.”

गौतम अदाणी बैठकीला होते

दरम्यान, एनसीपी भाजपा युतीसाठी पाच बैठका झाल्याचंही बोललं जातंय. या बैठकांबाबत अजित पवार म्हणाले, “हो. यासाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपात जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरलं होतं. परंतु, त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे”, असंही ते म्हणाले.

शरद पवारांच्या मनातलं माझी काकीही सांगू शकणार नाही

राष्ट्रवादी आणि भाजपाची युती होत असताना शरद पवारांनी नकार का दिला? त्यांनी या युतीला पाठिंबा का दिला नाही? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “शरद पवारांच्या मनात काय आहे, हे जगात कोणलाच ओळखता येणार नाही. कोणालाच नाही. मलाही नाही. माझी काकीही सांगू शकणार नाही.”

गौतम अदाणींची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या प्रकरणावर गौतम अदाणींच्या प्रतिक्रियेसाठी इंडियन एक्स्प्रेसने अदाणींच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तसंच, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अजित पवारांनी मुलाखतीत पाच वर्षांपूर्वीचा उल्लेख केलाय. मात्र, गौतम अदाणी २०१७ च्या बैठकीत हजर होते, असं भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

Story img Loader