गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी ती तिच्या लीक होणाऱ्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या कार्यक्रमातील हावभाव आणि नृत्याच्या पद्धतीवरून चर्चेत किंवा वादात असते. सोशल मीडियावरही गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ आणि विरोधात नेटिझन्सचे गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच गौतमी पाटीलला मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर धमकी देण्यात आली होती. त्यावर आता गौतमी पाटीलनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका वाद काय?

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर टीका होताना दिसत आहे. सातत्याने तिच्या नृत्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटना टीका करत असताना आता मराठा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रत न होऊ देण्याचा जाहीर इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही. मराठ्यांचं पाटील हे नाव खराब करण्याचं तिचं षड्यंत्र आहे”, अशी भूमिका राजेंद्र जराड पाटील यांनी मांडली आहे.

राजकारणात येणार का? गौतमी पाटीलची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, यासंदर्भात एका कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलला माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. “माझं आडनाव जर पाटील आहे, तर मी पाटीलच लावणार ना?” असा प्रतिप्रश्नच गौतमी पाटीलनं केला आहे.

“कुणाला जर माझ्या कार्यक्रमावर प्रश्न असतील, तर…”

दरम्यान, गौतमी पाटीलनं तिच्या कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्यांनाही जाहीर आव्हान दिलं आहे. “मी कार्यक्रमात कुणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. चांगला पार पडतो. मला कोण काय नावं ठेवतो, यानं फरक पडत नाही. ज्याला काही प्रश्न असतील माझ्या कार्यक्रमावर, त्यानं येऊन माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा आणि मग बोलावं की काय चाललंय”, असं गौतमी पाटील म्हणाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil challenges critics on patil surname dance program pmw