रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पुर्ये खालचीवाडी येथे मंगळवारी रात्री गवारेडा विहीरीत पडला. विहिरीतील पाण्यावर तो तरंगू न शकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला.

पुर्ये खालचीवाडी येथे असलेल्या विहिरीत काहीतरी पडल्याच्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले असता त्यांना गवारेडा विहिरीत पडलेला दिसला. त्यानंतर या घटनेची वनविभागाला खबर देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहरीची उंची सुमारे ३० फूट तसेच पाणी १० ते १२ फूट होते. त्यामुळे काहीवेळ पाण्यावर तरंगत असलेला गवारेडा पाण्यात बुडाला.

बुडत असलेल्या गवारेड्याला बाहेर काढण्यासाठी पुर्ये खालचीवाडी व परिसरातील नागरिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी मृत्यु झालेल्या गवारेड्याला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.बुधवारी सकाळी त्याचा पंचनामा करण्यात येवून वन विभागाने गवा रेड्याचा बुडून मृत्यु झाल्याचे सांगितले.

Story img Loader