कुख्यात गुंड अरूण गवळी याने आता पॅरोल मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलाच्या लग्नाला हजर राहता यावे, यासाठी अरूण गवळीने काही दिवसांपूर्वी केलेला पॅरोलचा अर्ज नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळला होता. त्यामुळे ‘डॅडी’ पॅरोलसाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी अरूण गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर येत्या काही दिवसांत गवळीच्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १६ मार्च २०१५ त्याची रवानगी मुंबईवरून नागपूरच्या कारागृहात करण्यात आली होती. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीच्या मुलाचा ९ मे रोजी मुंबईला टर्प क्लब मेंबर्स एनक्लोसर रेसकोर्स, महालक्ष्मी या ठिकाणी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या समारंभाला त्याला जायचे असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पॅरोलवर जाण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, गवळी कारागृहाच्या बाहेर आला, तर साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा अहवाल गृहखात्याने दिल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा पॅरोल अर्ज फेटाळला होता. अरुण गवळी याचा मुलगा महेश याचा विवाह ९ मे रोजी कृतिका अहीर या नागपूरच्या मुलीशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका अरुण गवळीने विभागीय आयुक्तांना दिलेल्या अर्जाला जोडली होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2015 रोजी प्रकाशित
पॅरोलसाठी अरुण गवळीची उच्च न्यायालयात धाव
कुख्यात गुंड अरूण गवळी याने आता पॅरोल मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलाच्या लग्नाला हजर राहता यावे, यासाठी अरूण गवळीने काही दिवसांपूर्वी केलेला पॅरोलचा अर्ज नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळला होता
First published on: 27-04-2015 at 06:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gawli went in hc for parole to attend his sons wedding