प्रदीप नणंदकर, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लातूर : ‘आपल्या देशातील सोयाबीनची एकरी उत्पादकता चार क्विंटल तर विदेशात ही उत्पादकता तीस क्विंटलपर्यंत आहे . आपल्या देशातील विद्यापीठातील शास्त्रज्ञ काय करतात, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच उपस्थित केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पण विदेशात व आपल्या देशात बराच फरक आहे. तेथे यांत्रिकीकरणाचा तसेच जीएम बियाणांचा वापर केला जातो. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो ही बाब नेमकी दुर्लक्षित केली जाते.
सोयाबीनचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या अमेरिका, अर्जेटिना, ब्राझील या देशांतील शेतीचे क्षेत्र मोठे आहे .यांत्रिकीकरणाचा वापर केला जातो .पेरणी, काढणी, फवारणी यासाठी यंत्राचा वापर होत असल्यामुळे योग्य वेळी सगळी कामे होतात .याशिवाय तेथील सोयाबीनचे पीक हे १३५ ते १५० दिवसांचे असते. याशिवाय बियाणे जीएम असते. त्यामुळे तेथील उत्पादकता अधिक आहे. पिकाला लागणारे खत, औषध याची योग्य प्रमाणात मात्रा देण्याची यंत्रणा त्या ठिकाणी आहे या उलट आपल्या देशात जमिनीचे क्षेत्र कमी आहे. प्रत्येक ठिकाणच्या वातावरणामध्ये बदल आहे, कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पावसाची अनिश्चितता आहे. रोगांचे प्रमाण अधिक आहे. ९० ते ११०दिवसांचे वाढ आहेत, पावसाचा कालावधी कमी आहे, अशी विविध कारणे आहेत. याशिवाय जीएम तंत्रज्ञानाचे बियाणे वापरण्यासाठी सरकारी धोरण हे मुख्य अडसर आहे. सोयाबीनची उत्पादकता वाढावी यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जातात. आपल्या देशात खाद्यतेल आयात करावे लागते. विदेशातून जीएम सोयाबीनचे तयार खाद्यतेल आयात केले जाते मात्र जीएम सोयाबीन आयात करायला बंदी आहे. नेमके याबद्दलची कारणे काय आहेत हे कोणी सांगत नाही. बीटी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होतो आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्या देशातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञाने व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकाने अनेक संशोधने केले आहेत. आपल्याकडील बीटी वांगे बांगलादेशाने मागून घेतले व त्या वाणाचा चांगला उपयोग बांगलादेशाने केला व जगभर ते वांगे विकले जाते आहे. आतापर्यंत त्याच्या दुष्परिणामासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. याचबरोबर गेल्या आठ वर्षांपूर्वी बीटी तूर बियाणे तयार आहे मात्र त्याचे प्रयोग करण्यास सरकार परवानगी देत नाही.
स्वदेशी जागरण मंच असेल किंवा मेधा पाटकर यांच्यासारख्या काही मंडळीचा याला विरोध आहे या सर्व मंडळींना आपण स्वत: भेटून त्यांचा विरोध समजून घेऊन आपली बाजू त्यांना सांगणार असल्याचे गडकरींनी यापूर्वीच सांगितले होते त्याचे नेमके काय झाले ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. उत्पादनात वाढ व्हावी यासाठी जीएम तंत्रज्ञानाचा वापर झाला तर आत्ता जे सोयाबीनचे उत्पादन आहे त्या उत्पादकतेत चौपटपर्यंत वाढ होऊ शकते.
विद्यापीठाच्या संशोधनाची कमतरता नक्की आहे मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धोरणांची मोठी अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी गडकरींनी शेतकऱ्यांची वकिली करण्याची गरज आहे .
एकात्म विचार होण्याची गरज
जीएम वाणाला सातत्याने विरोध करणारे गोविंदाचार्य यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले आमचा याबाबतीत पूर्वीही विरोध होता व आताही विरोध आहे. जीएम वाणाची उत्पादकता चांगली आहे, हे सर्वज्ञात आहे. मात्र केवळ उत्पादकता हा एकच निकष लागू करून चालेल का ? पर्यावरणाचे परिणाम काय होतात, शरीर शास्त्रावर परिणाम काय होतात ?आर्थिक विषयावरती काय परिणाम होतात. या सर्व बाबींचा शास्त्रोक्त अभ्यास करून तो लोकांच्या समोर आला पाहिजे व त्यानंतर एकात्मिक विचार करून निर्णय घ्यायला हवा .आम्ही एकांगी विचार मांडत नाहीत. केवळ उत्पादन वाढावे यासाठी वाट्टेल ते तंत्रज्ञान आले तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. सर्व बाबींचा चोहेबाजूने विचार करून निर्णय घ्यायला हवा एवढेच आमचे म्हणणे आहे व हीच आमची भूमिका आहे. गोविंदाचार्य व अनेक सर्वोदय ,समाजवादी मंडळींचे म्हणणे लक्षात घेऊन यासंबंधी सरकारने निर्णय करायला हवा केवळ विद्यापीठातील शास्त्रज्ञांना दोष देऊन सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही एवढे मात्र खरे.