राहाता : ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकामध्ये नवऱ्या मुलाचे विमान परदेशात गेले होते. सोमवारी मात्र जर्मनीचे वऱ्हाड थेट नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी सारख्या दुष्काळी गावात पोहंचले. विशेष म्हणजे या वऱ्हाडाने लग्नाच्या वरातीत ग्रामीण भागातील डीजेच्या तालावर ठेका धरला आणि बघता बघता खेडय़ातील तरुणाईचीही पावले थिरकण्यास सुरुवात झाली. लग्नानंतर या परदेशी पाहुण्यांनी पंगतीत भारतीय बैठक मारत अस्सल मराठमोळय़ा लग्नातील जेवणाचा आस्वाद घेतला.

भनगडेवाडी येथील शेतकरी तुकाराम पठाडे यांच्या मुलाचे प्राथमिक शिक्षण भनगडेवाडीत तर माध्यमिक शिक्षण भाळवणीच्या महात्मा फुले विद्यालयात झाले. बारावीनंतर त्याने नागपूर विद्यापीठातून पशुवैद्यक (बीव्हीएस्सी)ची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी व संशोधनासाठी गणेश जर्मनीला गेला. तेथे त्याने ‘जनावरांमधील मधुमेह’ या विषयावर पीएचडी मिळवली. तेथेच त्याची डॉ. कॅथरिनाशी मैत्री झाली. मैत्रीतून या दोघांची मने जुळली आणि या दोघांनीही आयुष्याची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु ही गोष्ट गणेशच्या घरच्यांना रुचली नाही. काही कालावधीनंतर त्यांनी या लग्नास होकार दिला. कॅथरिनाची आई लॉरिया व वडील व्हिक्टर इटस्कॉवीच यांनीही या लग्नाला होकार दिला. हे दोघेही स्वित्र्झलड मध्ये काम करतात.

BCCI Announces 5 Crore Cash Prize For India U19 Womens Team for Winning T20 World Cup
U19 World Cup 2025: भारताच्या U19 मुलींचा विश्वविजेता संघ झाला मालामाल, BCCIने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nagpur At AIIMS traditional healers showcased herbal medicines and medicinal plants from Gadchiroli and remote areas
‘आदिवासींच्या गावात’ वनऔषधींचा खजाना… नागपूर ‘एम्स’मध्ये…
woman from Buldhana missing after Prayagraj stampede has been found in Varanasi
कुंभमेळ्यात बेपत्ता महिला सापडली, वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत; पालकमंत्र्यांनीही…
Fiftieth anniversary of the womens movement The roots of womens liberation in land rights movement
स्त्री चळवळीची पन्नाशी! भूमी हक्काच्या चळवळीत स्त्रीमुक्तीची बीजे
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
Mahatma Gandhi, Mahatma Gandhi Book,
महात्मा गांधीचे ‘सत्याचे प्रयोग’ अन् बंदीवानांची परीक्षा….
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मराठमोळय़ा पद्धतीने सोमवारी या लग्नाचा बार उडवण्यात आला. संस्कृतीप्रमाणे साखरपुडा, हळद, वर-वधू मिरवणूक व रात्री वरात, या सर्व कार्यक्रमात जर्मनीकर पाहुण्यांनी सहभाग घेतला. लग्न समारंभानंतर जर्मनीच्या डर्सडेन शहरातील डॉ. कॅथरिना ही पारनेर तालुक्यातील भनगडेवाडीच्या पठारे कुटुंबीयांची सून झाली. या विवाह सोहळय़ात सूनमुख पाहण्यापासून कानपिळीपर्यंत आणि रुखवतापासून मांडव परतणीपर्यंतचे सगळे सोपस्कार विनाविघ्न पार पडले. लॉरिया व व्हिक्टर या वधू माता-पित्यांबरोबरच जर्मनीतून विमानाने आलेले ३० वऱ्हाडी हा मराठमोळा विवाह सोहळा बघून थक्क झाले.

जर्मनीच्या वऱ्हाडातील महिलांनी भारतीय वेशभूषेत सोहळय़ात भाग घेतला होता. वधूने भारतीय संस्कृतीप्रमाणे साडी तर वराने शेरवानी परिधान केली होती. वधू-वराची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी परदेशी पाहुण्यांनी बँडच्या तालावर ठेका धरला होता. या लग्नाच्या रीतसर निमंत्रणपत्रिका पठारे कुटुंबीयांनी छापल्या होत्या. जर्मनीच्या वऱ्हाडाला हिंदू संस्कृतीतील लग्नाचे सर्व सोपस्कार नवीन होते.

Story img Loader