संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबाकाकांची िदडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८व्या मराठी साहित्यसंमेलनासाठी जाणार असलेल्या गोरोबाकाकांच्या िदडीत जिल्ह्यातील १९० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गोरोबाकाकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग, तसेच गोरोबाकाका व संत नामदेवांच्या भेटीचा देखावा िदडीतून पंजाबमध्ये मांडण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने या दृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे.
मराठवाडय़ातील भूमीत जन्मलेले आणि िहदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पताका घेऊन जाणारे संत नामदेव यांच्या कर्मभूमीत यंदा ३, ४ व ५ एप्रिलला हे संमेलन होणार आहे. उस्मानाबादकरांसाठी मात्र हे संमेलन जिल्ह्याच्या इतिहासाला उजाळा देणारे ठरणार आहे. संत नामदेव यांची परीक्षा घेणाऱ्या संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या पावनभूमीत बाराव्या शतकात पहिला मराठी सारस्वतांचा मेळा भरला होता. संत ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताई, विसोबा खेचर, संत नामदेव यांच्यासह तत्कालीन संतमंडळी यानिमित्त एकत्र जमली होती. याच ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईने नामदेवांच्या ठायी असलेला अहंकार गोरोबाकाकांच्या निदर्शनास आणून दिला. गोरोबाकाकांनी नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे, असे सांगत ‘गोरा म्हणे कोरा, राहिला गं बाई शून्यभर नाही भाजिला कोठे’ या अभंगओळी लिहून ठेवल्या. त्यानंतर संत नामदेवांनी आत्मपरीक्षण करीत मूळ बार्शीचे आणि औंढा नागनाथ येथे वास्तव्यास असलेल्या विसोबा खेचरांचा अनुग्रह प्राप्त केला. त्यांना गुरुस्थानी मानून पुढील कामाची दिशा ठरवली आणि सबंध िहदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पताका पोहोचवण्याचे अलौकिक कार्य केले.
तेर येथे बाराव्या शतकात भरलेली संतमंडळींची सभा खऱ्या अर्थाने पहिले अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन असल्याची श्रद्धा उस्मानाबादकर आजही बाळगतात. संत नामदेव हे गोरोबाकाकांच्या भेटीसाठी तेर येथे मोठय़ा श्रद्धेने येऊन गेले. तीच श्रद्धा मनात ठेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने घुमानमध्ये गोरोबाकाका आणि नामदेव महाराजांची अलौकिक भेट घडविण्यासाठी या िदडीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातून गोरोबाकाकांचे १९० प्रतिनिधी संत नामदेवमहाराजांच्या कर्मभूमीत पताका घेऊन मोठय़ा उत्साहाने सहभागी होणार आहेत. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रासह पंजाबमधील नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यास जय्यत तयारी सुरू केली आहे.
गोरोबाकाका ही उस्मानाबादकरांची ओळख
वारकरी संप्रदायात आदराचे स्थान प्राप्त केलेले संतश्रेष्ठ गोरोबाकाका हीच खरी उस्मानाबादकरांची ओळख. त्यामुळे घुमान साहित्यसंमेलनात गोरोबाकाकांची िदडी मोठय़ा उत्साहाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. १९०पेक्षा अधिक जणांनी िदडीत सहभागी होण्यासाठी प्रतिनिधी शुल्क जमा करून नोंदणी केली. ३१ मार्चला सायंकाळी ५ वाजता हे सर्व गोरोबाकाकांचे प्रतिनिधी नाशिकहून रेल्वेने घुमानकडे मार्गस्थ होतील. तेथे वारकऱ्यांच्या पोशाखात, फेटे, पताका, टाळ, मृदुंग आणि गोरोबाकाका व नामदेवमहाराजांच्या अभंगांचे फलक घेऊन पंजाबवासीयांना गोरोबाकाकांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोरोबाकाकांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झालेल्या घुमान या नामदेवमहाराजांच्या कर्मभूमीत रंगणारी ही िदडी ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केला.
गोरोबाकाका दिंडीची घुमानवारी पंजाबसाठी ठरणार पर्वणी!
संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबाकाकांची िदडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे होणाऱ्या ८८व्या मराठी साहित्यसंमेलनासाठी जाणार असलेल्या गोरोबाकाकांच्या िदडीत जिल्ह्यातील १९० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
First published on: 20-03-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghumanwari in punjab of saint gorobabaka dindi