उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. “उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं,” असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपा नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२०१९ साली शरद पवार यांनी दिल्लीत भाजपाबरोबर ४ वेळा बैठका घेतल्या. पण, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून घात केला,” असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात गेले नाही, आता…”, अजित पवार गटातील आमदाराची टीका

गिरीश महाजन म्हणाले, “२०१४ ते २०१९ दरम्यान शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठिशी आहे’ असं शरद पवारांनी सांगितलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी दिल्लीत भाजपाबरोबर ४ वेळा बैठका घेतल्या.”

“बैठकांमध्ये सगळं ठरलं होतं. शरद पवार यांची आमच्याबरोबर चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून शरद पवारांनी घात केला,” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…”

“…तर मी राजकारणात निवृत्त होईन”

दरम्यान, कोल्हापुरातील सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं. “लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्याबाबत ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल, तर मी राजकारणात निवृत्त होईन. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का?” असं अप्रत्यक्षपणे आव्हान अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan attacks sharad pawar over alliance with bjp 2019 ssa
Show comments