महायुतीचे समन्वय मेळावे रविवारी ( १४ जानेवारी ) महाराष्ट्रात पार पडले. जळगावात झालेल्या समन्वय मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रात लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी. ठाकरे गटाकडून २५ ते ३० जागांची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटानं २५ जागांवर लढावं किंवा ३ जागांवर लढावं. पण, एका जागेवर निट लक्ष देऊन खासदार निवडून आणून दाखवावा.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“भारत जगात एक नंबर होईल”

“नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं जनतेनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण ४०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. सत्ता आल्यानंतर भारत जगात एक नंबर बनेल. जगातील नेते पंतप्रधान मोदींची प्रशंसा करतात. या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत,” असं गिरीश महाजनांनी सांगितलं.

“अनपेक्षित लोक भाजपात प्रवेश करताना दिसतील”

“मुरली देवरांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढील १५ दिवसांच्या कालावधीत अनपेक्षित अशी लोक भाजपात प्रवेश करताना दिसतील,” असं मोठं विधानही गिरीश महाजनांनी केलं आहे.