नुकताच जळगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाल्याचं बघायला मिळालं. या निकालावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. हा खोके संस्कृतीविरोधातील विजय असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “अमित शाह यांच्या भीतीने…”, ‘वज्रमूठ’ सभेवरून आशिष शेलारांचं टीकास्र!

काय म्हणाले गिरीश महाजन?

टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “दुध डेअरी आणि बॅंकेच्या निडवणुकीत आपली काय परिस्थिती झाली, याकडे एकनाथ खडसे यांनी लक्ष द्यावं. त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाजार समितीचा निकालाची टिमकी वाजवण्यापेक्षा आपल्या विधानसभा क्षेत्रात नेमकी काय परिस्थिती आहे. ते एकदा बघावं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO: उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते उबाठावाले…”

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते?

सोमवारी बाजार समितीच्या निकालावर बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. “जळगाव जिल्ह्यातील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या सर्व १८ जागा निवडून आल्या आहेत. आम्ही खोके संस्कृतीवर विजय मिळवला. आगामी विधानसभेच्या कालखंडातही हेच चित्र राहील”, असे ते म्हणाले होते.

Story img Loader