मुक्ताई नगर येथील खडसे परिवाराच्या मालकीची असलेल्या जमिनीतून अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणात एसआयटीनं चौकशी करून अहवाल सादर केला. महसूल विभागानं हा अहवाल मान्य करून १३७ कोटी रूपयांची दंडात्मक नोटीस खडसेंना बजावली आहे. यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपाला लक्ष्य केलं होतं.
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर भाजपाकडून छळ सुरू आहे. नाथाभाऊ नाउमेद होऊन पुन्हा भाजपाकडं येतील, असं त्यांना वाटत आहे. पण, भाजपानं कितीही छळलं, तरी नाथाभाऊ झुकनेवाला नहीं,” असा पुष्पास्टाईल इशारा खडसेंनी भाजपाला दिला होता. याला मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा: “हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे अन्…”, शिंदे गटातील नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका
“तुम्ही उत्खनन केलेलं गौण खनिज कुठं गेलं?”
“एकनाथ खडसेंना पुष्पा चित्रपटाचे डायलॉग आठवत आहेत. मात्र, छळ करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला ठोठावण्यात आलेला दंड चुकीचा असल्याचं पटवून द्या. तुम्ही उत्खनन केलेलं गौण खनिज कुठं गेलं? विधानसभेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एसआयटी चौकशी नेमण्यात आली होती. एसआयटीच्या चौकशीत १ लाख १२ हजारच्या आसपास गौण खनिज उत्खनन केल्याचं समोर आलं आहे. हे सर्व मुक्ताई नगरकरांनी पाहिलं आहे,” असं गिरीश महाजन म्हणाले.
“एसआयटी नोटीसाला खडसेंनी उत्तर दिलं नाही”
“चार वर्षापूर्वी ही जमीन गौण खनिज विकण्याच्या दृष्टीनेच तुम्ही खरेदी केली होती. त्यातून कोट्यवधी रूपयांची कमाई तुम्ही केली. कुठलाच व्यवहार झाला नसल्याचं पटवून द्या. एसआयटीनं नोटीस पाठवल्यानंतर खडसेंनी उत्तरही दिलं नाही,” असेही महाजनांनी सांगितलं.
हेही वाचा: “ताकदच बघायची असेल, तर…” अनिल परबांचं शिंदे गटाला थेट आव्हान
“तुम्ही लहापणापासून स्वयंसेवक संघाचे सेवक होता का?”
“माझ्याकडं यांच्यासारखे चोरीचे उतारे नाहीत. मी कुठं एमआयडीसीत जमीन घेतली नाही. हे मला मंत्री करणारे कोण आहेत? प्रत्येकजण आपल्या कार्यक्षमतेने सिद्ध होतो. काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतर १९९० साली पहिल्यांदा तुम्हाला आमदार केलं. हे तुम्ही का सांगत नाही? तुम्ही लहापणापासून स्वयंसेवक संघाचे सेवक होता का? काँग्रेस नेते हरीभाऊ जावळेंच्या पाठीमागे पिशवी घेऊन तुम्ही फिरत होता,” अशी टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला आहे.