राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी काळातील नेतृत्वाचे स्पष्ट संकेत पवारांनी दिले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना साईडलाईन केलं असल्याचं बोललं जात आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी महाजन यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांना साईडलाईन केलं जात असल्याची चर्चा असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे, यावर तुम्ही काय सांगाल. या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, खरंतर हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु अजित दादा हे महाराष्ट्रातलं सक्षम नेतृत्व आहे, हे सर्वांनाच मान्य आहे.

गिरीश महाजन म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे आहेत (सध्याचे कार्याध्यक्ष किंवा पक्षातील इतर नेते) त्यांच्यापेक्षा अजितदादा हे सरसच होते, हे निश्चित सरगळ्यांनाच मान्य आहे आणि राज्यालाही मान्य आहे. अशा परिस्थित्तीत त्यांना बाजूला सारलं गेलं, त्यांना मोठी जबबादारी दिली गेली नाही. मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत वादाचा भाग आहे किंवा अंतर्गत निर्णयाचा भाग आहे. त्यामुळे त्यात न पडलेलं बरं. पण निश्चितच या सगळ्यांपेक्षा दादा हे त्या पक्षात सक्षम आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan says ajit pawar is more capable leader than others asc
Show comments