नाशिकमधील बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असणाऱया प्रणाली रहाणे या तरूणीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
प्रणाली रहाणे बॉश या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होती. कामावर तिचे सहकारी तिच्यावर रॅगिंग करत असत, काही दिवसांपासून या सर्व प्रकारावरून ती मानसिकरित्या अस्वस्थ होती. अखेर रॅगिंगच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी बॉश कंपनीतील एकूण दहा सहकाऱयांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घडलेल्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader