फेसबुकवर बोगस प्रोफाइल बनवून खालापूर येथील एका युवतीचे अश्लील फोटो व बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला होता. ही बाब सदर युवत व तिच्या पालकांच्या निदर्शनास आली. अखेर या युवतीने नुकतीच खालापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६ अ व ६७ अ, भा.दं.वि. कलम २९२, ५०९ अन्वये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. इरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बडाख वेगाने तपास करीत आहेत.

Story img Loader