अभ्यासाच्या तणावामुळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी येथे उघडकीस आली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नीलेश प्रकाश देवरे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शिवाजी विद्या प्रसारक अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांत तो शिक्षण घेत होता. गरिबीच्या परिस्थितीत शिवणकामाच्या माध्यमातून वडिलांनी त्याचे शिक्षण चालविले होते. नीलेशच्या शिक्षणासाठी शहरात त्यास खोलीही करून दिली होती. परंतु, त्याला अभ्यास झेपला नसल्याने तो या निर्णयाप्रत आल्याचा अंदाज मित्रांनी व्यक्त केला आहे.
नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ केंद्रात आरतीला जाऊन आल्यानंतर नीलेशने आपल्या राहत्या घरातील आतल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी वडील बाहेरील खोलीत शिवणकाम करत होते तर आई व बहीण काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. काही वेळानंतर हा प्रकार निदर्शनास आला. नीलेशकडे सापडलेल्या चिठ्ठीत आपल्या इच्छा पूर्ण करू शकलो नसल्याने त्याने कुटुंबियांची माफी मागितल्याचे नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा