जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजीबाबत फेरविचार करण्यासाठी शेवटची तारीख १७ एप्रिल आहे. तोपर्यंत सेमी इंग्रजीबाबत पालक समितीनी विचार करून मराठी माध्यमाला प्राधान्य द्यावे असे नीला आपटे व राजश्री विचारे-टिपणीस यांनी आवाहन केले आहे. शिक्षणवेध संमेलन उगम सावंतवाडी आयोजित येत्या शनिवार १३ व रविवार १४ एप्रिल रोजी बॅडमिंटन हॉल जिमखाना ढाबेवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ४ ते ७.३० वा. व रविवारी १० ते १.३० व ४ ते ७.३० वा. वेळ त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील सृजन आनंद विद्यालयाच्या संचालिका सुचेताताई पडळकर व मुक्ता दाभोलकर या मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी राज प्रिंट व हरिहर वाटवे यांच्याकडे नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सेमी इंग्रजी हे उत्तर नाही, असे सांगताना नीला आपटे व राजश्री विचारे-टिपणीस यांनी मुलांना व पालकांना आवाहन केले आहे. जिल्हा परिषद शाळा सेमी इंग्रजीला प्राधान्य देत आहे. शिवाय खासगी शाळांची संख्याही वाढत आहे. त्यावर विचार होण्याची गरज आहे असे ते म्हणाले. गुणवत्तापूर्वक शिक्षण, ज्ञानरचना, शिक्षण विषय यावर विचार करण्यासाठीच आम्ही पालकांना मार्गदर्शन करत आहोत. पालकांनी आपल्या मुलांचा सांगोपांग विचार करून शिक्षण वेध संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader