मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या उपोषणामुळे संपूर्ण मंत्रीमंडळाचे धाबे दणाणले आहेत. सरकारच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजनही उपोषण स्थळी जाऊन आले. परंतु, आंदोलकर्त्यांसोबत त्यांची चर्चा निप्षळ ठरली आहे. त्यानंतर, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >> वडेट्टीवार म्हणतात, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

“ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची हरकत नाही. पण जे काही आरक्षण असेल तेवढं वाढवलंच पाहिजे. नाहीतर तुमच्या आणि आमच्या वाट्याला काहीच मिळणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“केंद्रात नरेंद्र मोदींचं बहुमताचं सरकार आहे. त्यांनी विधेयक आणावं. १०-१२ टक्के आरक्षण वाढवून द्यावं. आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)ला एका झटक्यात आरक्षण वाढवलं. त्यामुळे मराठा समाजालाही देऊन टाका. ५० टक्क्यांच्या वर मर्यादा गेलीच आहे. हीच माझी भूमिका आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >> “मी मेलो तरी चालेल, पण पाच कोटी मराठे…”, मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमिका; महाजनांबरोबरची चर्चा निष्फळ

आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये आणखी वाढ करा

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेलतर ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये आणखी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ करावी. ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे आणि त्यांना मिळणारे आरक्षण केवळ २७ टक्के आहे. त्यामुळे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका शनिवारी (२ ऑगस्ट) वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात मांडली होती.

Story img Loader