‘खेडय़ाकडे चला’ असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते. त्या संकल्पनेची पूर्तता डी. के. मामाचं गाव दाभील येथे होत असल्याचे आज मला दिसले. दाभील गावाचा मामाचं गाव म्हणून डी. के. टुरिझम संस्थेने पर्यटन विकास करण्यासाठी टाकलेले पाऊल योग्यच असल्याचे मत सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी दाभील येथे व्यक्त केले.
दाभील मामाचं गावात राजमाता सत्त्वशीलादेवी यांच्यासह पर्यटकांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. शाळा ते मारुती मंदिपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मामाचं गाव दाभीलचा दीपप्रज्वलनाने शुभारंभ करताना राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले बोलत होत्या.
या वेळी डी. के. सावंत, विधानमंडळ उपसचिव सुभाषचंद्र तथा भाई मयेकर, डॉ. जी. ए. बुवा, भाई देऊलकर, कोकण कृषी पर्यटन संस्था संचालक बाळासाहेब परुळेकर, आनंद वसकर, दिनकर धारणकर, दीनानाथ बांदेकर, डी. के. टुरिझमचे मानद सचिव अशोक देसाई, रेश्मा सावंत, उपसभापती विनायक दळवी, बाळकृष्ण तथा आबा गवस, विष्णू घाडी आदी उपस्थित होते.
राजमाता भोसले यांनी संस्थानात १७१८ मध्ये धार्मिक पर्यटन तसेच सन १९३० मध्ये महात्मा गांधीजी आले असताना पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी नागरतास, कावळेसाद, नारायणगड आदी पर्यटन पॉइंट दाखविले होते असे सांगत त्या म्हणाल्या, दाभील सावंतवाडी संस्थानमधील गाव आज पर्यटनात उडी घेत आहे हे पाहून आनंद झाला. गांधीजींनी खेडय़ाकडे चला म्हटले होते. त्याला या अर्थाने खरी संकल्पना प्राप्त झाली आहे, असे सांगून राजमातांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. जी. ए. बुवा यांनी निसर्गसौंदर्यामुळे ग्रामीण भागात पर्यटनास लोक येऊ इच्छितात. त्यांचे आदरातिथ्य करतानाच संस्कृती समोर ठेवली तर मोठा वाव मिळणार असून पर्यटकांना आंबा, काजू, फणसाची आवड आहे, त्यामुळे पर्यटक आवर्जून येऊ शकतात, असे सांगत सावंतवाडी संस्थानच्या राजमाता पार्वतीदेवी यांनी पर्यटनाची कल्पना दिली. त्याबद्दल माहिती देत अजिंठामधील पर्यटक गाइडची कल्पना विशद केली.
कोकण सहकारी पर्यटन संस्था संचालक बाळासाहेब परुळेकर यांनी कृषी ग्रामीण पर्यटनात चौकुळ, डिंगणे, हडीनंतर दाभील गावाने पदार्पण केले आहे. कोकणाला उत्तुंग ते अथांग लाभले आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवत शहरातून आलेल्या पर्यटकांचे आदरातिथ्य राखत ग्रामीण पर्यटनाची आवड निर्माण करा. शासनही कृषी पर्यटनाला मदत करील असे परुळेकर म्हणाले.
विधानमंडळ उपसचिव सुभाषचंद्र तथा भाई मयेकर यांनी भारत देश महासत्ताक बनविण्यासाठी पर्यटन हाही एक उपाय असून, गोवा-कोकणचे पर्यटनाचे रूप आहे त्यात कोकणने आघाडी घ्यावी. कोकण जगाच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. आता पर्यटकांनाही अचंबित करून टाकावे, असे आवाहन केले.
या वेळी उपसभापती विनायक दळवी यांनी मार्गदर्शन केले. शिवाय द्वारका कृष्ण पर्यटन संस्था अध्यक्ष डी. के. सावंत यांनी मामाचं गाव संकल्पना, पर्यटनाची गरज याबद्दल प्रास्ताविक केले. बाळकृष्ण ऊर्फ आबा गवस यांनी देवी माऊलीस साकडे घातले.
या वेळी महिला बचत गटाच्या पार्वती गुरव, स्नेहल पास्ते, सुशीला जाधव, सुलभा गवस, हर्षदा गवस, शशिकांत गवस, विष्णू घाडी, आनंद गुरव, संकेत गुरव, सच्चिदानंद घाडी, सत्यवान घाडी व इतरांचा डी. के. टुरिझमच्या वतीने भेट देऊन सत्कार केला. राजमाता भोसले यांचाही शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दाभील गावी देवगड किल्ले महोत्सव समितीचे राजीव परुळेकर, पराडकर तसेच जिल्ह्य़ातून खास पर्यटकांनी भेट दिली. डी. के. मामाचं गाव आज आंबे, फणसाची चव चाखून पर्यटनात झेपावेल.
‘खेडय़ाकडे चला’ची संकल्पना अंमलात आणली
‘खेडय़ाकडे चला’ असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते. त्या संकल्पनेची पूर्तता डी. के. मामाचं गाव दाभील येथे होत असल्याचे आज मला दिसले. दाभील गावाचा मामाचं गाव म्हणून डी. के. टुरिझम संस्थेने पर्यटन विकास करण्यासाठी टाकलेले पाऊल योग्यच असल्याचे मत सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी दाभील येथे व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go toward village concept enforced to implement