गोव्यात सोमवारी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळेस गोव्याचे राज्यपाल बी.वी.वांचू यांनी राज्यात दिवसेंदिवस महिला व मुलींविरुद्ध वाढणा-या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. येथे क्रांतीदिन सुरु झाल्यापासून कायदा व सुव्यवस्थेमुळे समाधानकारक परिस्थिती असल्याचे वांचू यांनी सांगितले. पण तरीही या शांततापूर्ण राज्यात खासकरुन महिलाविरुद्ध होणा-या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी उशीर होण्याअगोदरच आवश्यक उपाय शोधण्याची गरज आहे. काही समाजकंटकांमुळे राज्यात तसेच संपूर्ण देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे महिलांच्या प्रतिमेवरही बट्टा लागत आहे, असेही राज्यपालांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त नागरिकांनीही समाजकंटकांविरुद्ध लक्ष दिले पाहिजे, जेणेकरुन राज्याच्या प्रगतीतील अडथळा कमी होईल. तसेच राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी नागरिकांची प्रशंसा करत विविध क्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी त्याकडे लक्षपूर्वक काम करण्यास सांगितले.
क्रांतीदिनाच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, स्वातंत्र्य सैनिक तसेच पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र करण्यास लढा देणारे मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा