अजुनी फुलांना गंध येतो,
अजुनी बकरी पाला खाते..
मर्ढेकरांच्या कवितेच्या या ओळींची आठवण यावी, असा थरारक प्रकार इर्शाळगडावर घडला. चार दिवसांपासून ‘त्या’ ६ जणी त्या उंच कडय़ावर अडकल्या होत्या. त्यांचा कडा उतरण्याचा आणि गावक ऱ्यांचा त्यांना वाचवण्याचा संघर्ष सुरू झाला. पाहता-पाहता ही बातमी चहुदिशांना पसरली. शहरातील काही गिर्यारोहक या कडय़ावर पोहोचले. दोर लागले, अन्य साहित्याची जोडाजोड झाली आणि त्या उंच कडय़ावरून एकेक करत ‘त्या’ सहा जणी खाली आल्या.
ही घटना आहे पनवेलजवळच्या इर्शाळगडावरची या गडाखालच्या एका आदिवासी पाडय़ावरील बक ऱ्या नेहमीप्रमाणे चाऱ्याच्या शोधात इर्शाळगडावर गेल्या होत्या. चारा शोधत असतानाच त्यांनी गडाच्या एका सरळ कडय़ावरच्या टप्प्यावर उडी घेतली. खरेतर बक ऱ्यांना कुठलाही डोंगर-कडा वरखाली करण्याची कला जन्मताच अवगत असते. पण इथे इर्शाळगडचा हा कडा सरळ धारेवरचा होता. इथून या बक ऱ्यांना खाली-वर कुठेच जाता येईना आणि त्यांच्यापर्यंत अन्य गावक ऱ्यांनाही पोहोचता येईना. त्या छोटय़ाशा जागेतच ते निष्पाप जीव, जीव मुठीत घेऊन फिरू लागले. सुटकेसाठी जिवाचा आकांत करू लागले. एक-दोन दिवस गेले, वरून दोरीने चारा सोडला गेला. चार दिवस उलटले तरी या बक ऱ्यांची सुटका करण्यात गावक ऱ्यांना अपयश येत होते. इर्शाळगडावरची बक ऱ्यांची तगमग आणि गावक ऱ्यांची ही धडपड आता शेजारच्या गावात आणि तिथून पनवेलपर्यंत पोहोचली. पनवेलमधील ‘दुर्गमित्र’ या गिर्यारोहण संस्थेच्या कानीही ही बातमी गेली. या संस्थेचे अजय गाडगीळ, विवेक पाटील, विनायक कानिटकर, राहुल खोत आदी गिर्यारोहक गावक ऱ्यांबरोबर इर्शाळगडावर पोहोचले. या कडय़ावरून बक ऱ्या असलेल्या जागी ते उतरले. गिर्यारोहकांना बांधतात त्याप्रमाणे त्यांना दोर, हारनेस, कॅरॅबिनर, बिले दोर बांधले गेले आणि खाली सोडलेल्या दोरावरून एकेक बकरी कडा उतरू लागली. पुढच्या तीन-चार तासांत या सर्व सहा बक ऱ्या दोरावरून इर्शाळगडचा हा कडा उतरल्या. त्या खाली येताच त्यांच्या सुटकेसाठी धडपड करणाऱ्या साऱ्याच गावक ऱ्यांनी जल्लोष केला. गिर्यारोहकांना खांद्यावर घेत त्यांचा जयजयकार झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा