गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली गोकुळ दूध महासंघाची सर्वसाधारण सभा आता राजकीय शक्तीप्रदर्शनाचा आखाडा बनतेय की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. सर्वसाधारण सभेआधीच महासंघातील सत्ताधारी सतेज पाटील गट व विरोधक शौमिका महाडिक गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोकुळ शिरगावमधील पंचतारांकित वसाहतीमधल्या मैदानात महासंघाची ६१ वी सभा होत असून तिथे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीपासून या राजकीय सुंदोपसुंदीची कायमच चर्चा राहिली आहे. महासंघावर सतेज पाटील गटाचं वर्चस्व असून महाडिक गट विरोधात आहे. मात्र, “सतेज पाटलांना फक्त महाडिकांचे टँकर व ठेका या दोन गोष्टी सोडून गोकुळबद्दल फारसं काही माहिती नाही”, अशा प्रकारची टीका शौमिका महाडिक यांनी केली होती. त्यामुळे सर्वसाधारण सभेआधीच वातावरण तापलं होतं. सभेच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी स्वतंत्रपणे दौरे आयोजित करून सभासदांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”

सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गोंधळ

दरम्यान, आज सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर महाडिक गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या कार्यकर्त्यांनी सभास्थळी लावलेले बॅरिकेट्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना शौमिका महाडिक यांनी महासंघातील सत्ताधारी सतेज पाटील गटावर गंभीर आरोप केले आहेत.

“आत असणारे निम्म्याहून अधिक सभासद बोगस आहेत. हे सभासद झेरॉक्स घेऊन आले आहेत. इथेच झेरॉक्स वाटण्यात आल्याचंही मला समजलंय. बाहेर थांबलेले अनेक खरे सभासद अजून आत गेलेले नाहीत. दोन किलोमीटरपर्यंत रांग लावलेली आहे. एका तासापासून हे लोक तिथे थांबलेले आहेत”, असं शौमिका महाडिक यांनी सभास्थळी माध्यमांना सांगितलं.

शौमिका महाडिकांचा गंभीर आरोप

“अशा प्रकारे बॅरिकेट्स लावण्याची पद्धत नसते. याचा अर्थ खरे सभासद इथे येणं तुम्हाला नकोच होतं. म्हणून ही यंत्रणा लावली आहे. त्यांच्यासाठी कदाचित हाच खेळ असेल. ते कशाला घाबरलेच हेच कळेना झालंय. झेंडे, पाण्याच्या बाटल्या सभास्थळी न्यायचे नाहीत असा नियम काढलाय”, अशा शब्दांत शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी गटावर हल्लाबोल केला.

दरम्यान, गोकुळ दूध महासंघाशी संबंधित दूधसंस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढूनही दूध संकलन मात्र त्या प्रमाणात वाढलं नसल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी याआधी केला आहे. या संस्था बोगस असून बाहेरून दूधखरेदी करत संकलनाचा आकडा फुगवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Story img Loader