लोकमान्य टिळकांची परंपरा जपणाऱ्या गोलबाजार गणेश मंडळाला यावर्षी १०७ वष्रे पूर्ण झाली आहेत. शहरातील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ अशी ओळख असलेल्या या मंडळाकडून आज पूर्वीसारखे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात नसले तरी ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारे भजन आणि गरिबांना भोजनदान या कार्यक्रमांची परंपरा आजही कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोंडराजाचे राज्य असतानापासूनचा गणेश मंडळाचा इतिहास असला तरी शहरातील सर्वात प्रथम व सर्वात जुना सार्वजनिक गणपती ‘गोलबाजार गणेश मंडळ’ असून या मंडळाची स्थापना १९०८ साली झाली. आज या गणेश मंडळाने १०७ व्या वर्षांत पर्दापण केले आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली असून ठिकठिकाणी अनेक गणेश मंडळे देखाव्यांनी लोकांना आकर्षित करतात. तर काही गणेश मंडळ नवसाचा गणपती अशी फसवी जाहिरातबाजी करून भक्तांना आकर्षित करीत आहेत. परंतु चंद्रपूर शहरातील सर्वात प्रथम व जुना गणतपती म्हणून आज गोलबाजार गणेश मंडळाला आठवण आजही करण्यात येते.
लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सवाला प्रथम सुरुवात केली होती. त्यांच्या काही वर्षांनंतरच या मंडळाने गोलबाजारात या मंडळाची स्थापन केली होती. त्यामुळे या मंडळाचे नावही गोलबाजार गणेश मंडळ असे करण्यात आले. ३१ ऑगस्ट १९०८ साली गोलबाजारात गणेश मूर्तीची स्थापना बाल गोविंद पंडित व बालाजीपंत येनुरकर यांच्या पुढाकारातून झाल्याची आठवण बालाजीपंतांचे नातू प्रमोद येनुरकर यांनी सांगितली. तेव्हा येथे मोठे टाके होते. याच टाक्यात बसून श्री गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून तर आज चार पिढय़ांपासून येथे गणेश मूर्तीची स्थापना दरवर्षी करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात या गणेश मंडळाकडून इंग्रजांविरुध्द लढा देणाऱ्या एकांकिका व नाटय़ प्रयोग सादर केले जायचे, स्वातंत्र्याचे पोवाडे, शिवाजी महाराजांची गाथा तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर नाटय़प्रयोग सादर केले जायचे. तेव्हा तर लोकप्रिय दंडार सुध्दा येथे सादर व्हायची.
कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्या गाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केल्या जायच्या. तसेच भजन व नाटय़मंडळीकडून मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण व्हायचे. परंतु आता काळासोबत या गणेश मंडळाचे कार्यक्रम मागे पडत गेले. आता गेल्या २५ ते ३० वर्षांंपासून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल थांबलेली आहे. प्रथमापासूनच येथे मूर्तीची उंची साडेतीन ते चार फूट असते व मूर्ती येथेच तयार करण्यात येते. यंदाचीही मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. या मंडळाने आपले नियम अगदी काटेकोरपणे पाळले आहे. रोज भक्त या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता येतात.
मंडळाचा ’भोजन व भजन’ याला महत्त्व दिले आहे. दरवर्षी २ हजारापेक्षा जास्त भाविक येथे भोजनाचा लाभ घेतात व दरवर्षी येथे भजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदा विर्सजनाच्या दिवशी भजन करण्याकरिता ३० मंडळीना निमंत्रण देण्यात आले असून विर्सजनाच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर आक्केवार यांनी दिली. भजन आणि भोजनदान या दोन उपक्रमांची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळेच गोलबाजार गणेश मंडळ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.