गजबजलेल्या सिडको येथील वात्सल्य नगर सोसायटीमधील व्यापारी रमेश दाचावार यांच्या राहत्या घरी गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सोन्याचे दागिने, ५० तोळे आणि ६ लाख रोख रक्कम घेऊन पळ काढला. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. चोरटे तोंडाला कपडा बांधून आले होते. तिथे असलेल्या एका चिमुरडीने ही घटना पाहिली असल्याचे बोलले जाते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६ ऑगस्ट रोजी गुरुवारी बाजारचा दिवस असल्याने मोठी वर्दळ पाहायला असते. हडको, वाघाळा भागातील नागरिक बाजारात खरेदी करण्यासाठी वात्सल्य नगर सोसायटीमधून ये-जा करतात. चोरटे तोंडावर रुमाल बांधून दाचावार यांच्या तीन मजली घरात घुसले होते. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस उप अधीक्षक सिद्धेश्‍वर भोर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाचावार यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.

दाचावार यांचे सिडको मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान आहे आणि इतर दोन भाऊ प्रदीप व दिलीप दाचावार यांचेही व्यापारी प्रतिष्ठान आहेत. भरदिवसा घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविल्यानंतर चोरटा घरातीलच असल्याचे लक्षात आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold and cash robbery in nanded adn