गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधजवळ ग्राम खोबा येथे काल (बुधवार) रात्री ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवेगावबांध धरणात सौरपंप बसवून भजियापार (आमगाव) येथे घरी परत येत असताना चारचाकी वाहनाचा तोल बिघडला व गाडी रस्त्याच्या खाली उतरून झाडाला आदळली.या अपघातात कारमधील पाच पैकी चार कर्मचारी जागीच ठार झाले. रामकृष्ण योगराज बिसेन, वय २४ वर्षे, सचिन गोरेलाल कात्रे, वय २४ वर्षे, संदीप जागेश्वर सोनवणे वय १८ वर्षे, व भजियापारचे वरुण नीलेश तुरकर वय २७, असे मृतांचे नाव आहे.

खोबा येथील घटनास्थळाहून मृतदेह ग्रामीण रूग्णालय नवेगावबांध येथे शवविच्छेदन करिता आणण्यात आले होते. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास नवेगावबांधचे साहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पांढरे हे करीत आहेत. गंभीर जखमीला गोंदियातील केटीएस शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.