राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी आज सोलापूरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने शहर बंदचे आव्हान केले आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून, बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे.

हेही वाचा- किचन महाराष्ट्रात तर हॉल तेलंगणमध्ये… दोन राज्यांच्या सीमांमुळे विभागलेल्या पवार कुटुंबाच्या अजब घराची गजब गोष्ट

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

सोलापूर बंद यशस्वी होण्यासाठी उध्दव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटना, वीरशैव लिंगायत समन्वय समिती, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आदी संघटना सक्रिय झाल्या होत्या. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे हे राजकीय पक्ष ‘सोलापूर बंद’ पासून दुर होते. विशेषतः उध्दव ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष यानिमित्ताने आमनेसामने आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली होती.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पांजरापोळ चौकात शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ बंद समर्पक सर्व राजकीय पक्ष व अन्य संघटनांचे नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. उध्वस्त ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष माजी उपमहापूर पद्माकर काळे, उध्दव ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक मधुकर आठवले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुनीता रोटे, काँग्रेसच्या हेमा चिंचोळकर, प्रमिला तूपलवंडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा- “…तर मी सगळ्या भाजपावाल्यांची पळता भुई थोडी करेन”, सुषमा अंधारे आक्रमक; भाजपाला इशारा देत म्हणाल्या, “आत्तातरी…

शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करून मूकमोर्चा काढण्यात आला. प्रमुख रस्त्यांवरून फिरत हा मूकमोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकात मूकमोर्चा पोहोचला. नवी पेठ, मेकॅनिक चौक, एसटी बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसर, माणिक चौक, मधला मारूती, सराफ कट्टा, हलवाई गल्ली, टिळक चौक, चाटी गल्ली, भुसार गल्ली, कुंभार वेस, अशोक चौक, होटगी रोड, विजापूर रोड, सात रस्ता, पाच्छा पेठ, हैदराबाद रोड, भवानी पेठ, साखर पेठ, विजापूर वेस, बाळे, रविवार पेठ आदी सर्व भागात सोलापूर बंदचा परिणाम दिसत होता. ऑटो रिक्षांची वाहतूकही तुरळक होती. इंदिरा गांधी घरकूल आणि कुंभारीच्या गोदूताई परूळेकर विडी घरकूल परिसरातही ‘ बंद ‘ चा प्रभाव दिसून आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील यंत्रमाग, गारमेंटसह बहुतांशी उद्योग बंद होते. तेथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सिटू व माकपचे कार्यकर्ते बंद पाळण्यासाठी झटत होते. दुपारनंतर बंद हळूहळू निवळला.