उक्शी स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी एका मालगाडीचे चार डबे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. संगमेश्वर आणि निवसारमधील बोगद्यामध्ये हा अपघात झाला. दरम्यान, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी १२ ते १४ तास लागतील अशी माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. अपघातामुळे दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन, जनशताब्दी मेल, दुरान्तो एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गावरील काही गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात येणार असून काही गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचेही कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त लवकर.

Story img Loader