सोलापुरातील करमाळा तालुक्यात मालगाडी रुळावरुन घसरुन दुर्घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील केम येथे हा रेल्वे अपघात घडला. ही मालगाडी सोलापूर येथून पुणे येथे जात असताना दुर्घटना घडली आणि इंजिन थेट शेतात घुसलं. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचं इंजिन आणि दोन डबे रुळावरुन घसरले. यानंतर मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसलं आणि त्यानंतरच थांबलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चौकशीनंतर अपघाताचं कारण समोर येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.