उस्मानाबाद येथे एक ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये ७० लाख रुपयांचा माल होता. तेथील रहिवासी आणि ग्रामस्थांनी हा माल लुटला आहे.  लोकांकडून लुटलेला माल परत आणण्यासाठी पोलिसांना पथके तयार करून आजूबाजूच्या भागात मोहीम राबवावी लागली.

वाशी तहसीलमधील तेरखेडाच्या लक्ष्मी पारधी पेडीजवळ पहाटे तीन वाजता सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  ते म्हणाले, ट्रकमध्ये मोबाइल फोन, संगणक, एलईडी, खेळणी व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. सामान रस्त्यावर पडल्यानंतर ग्रामस्थांनी ते लुटण्यास सुरवात केली आणि काही लोकांनी कंटेनरचा दरवाजा तोडला. दरम्यान, स्थानिक पोलीस  नियंत्रण दलाला बोलावून घ्यावे लागले.

हेही वाचा- मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा

अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ग्रामस्थांनी पोलिसांच्या आवाहनानंतर हा माल परत केला, परंतु बऱ्याच लोकांनी माल परत आले केला नाही. पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड म्हणाले की, ७० लाख रुपयांच्या मालाची लूट झाली असेल. आतापर्यंत आम्ही ४० टक्के माल परत मिळवलै आहे. तसेच लोकांना माल परत करण्यास सांगितले जात आहे.

Story img Loader