ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे. त्यांचे समाजकार्य, त्यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा या सगळ्याचा आढावा या खास डुडलमधून घेण्यात आला आहे. 26 डिसेंबर म्हणजे बाबा आमटे यांची जयंती. सगळ्या समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटेंना गुगलने ही अनोखी मानवंदना दिली आहे.

डॉ. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेंचे खरे नाव. चंद्रपुरात कुष्ठरोग्यांना आपलं म्हणणारा आनंदवन हा आश्रम त्यांनी सुरु केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा प्रमुख सहभाग होता. बाबा आमटेंनी एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिलं. त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यांनी एक क्षण असा विचार केला की त्या कुष्ठरोग्याच्या जागी जर मी असतो तर? आणि दुसऱ्या क्षणी बाबा त्या माणसाला घेऊन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचाच ध्यास घेतला.
बाबा आमटे यांचे समाजकार्य महान आहे. त्यांची पुढची पिढीही त्यांचा वारसा चालवते आहे. समाजाला नवी दिशा देणाऱ्या माणसाच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे.

 

 

Story img Loader