भाजपा आमदार गोपीचंद पडळकर बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘लांडगा’ म्हणून उल्लेख केला होता. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ‘फालतू’ म्हणून उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना लक्ष्य करत ‘महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्व लोकांना माहिती आहे’ अशी टीका केली होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटलांनी गोपींचद पडळकरांसारख्यांवर बोलत नसल्याचं सांगितलं होतं. याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं.

“जयंत पाटील यांच्यासारख्या फालतू माणसावर मी बोलत नाही,” असं टीकास्र गोपीचंद पडळकरांनी डागलं आहे.

शरद पवारांवर काय बोलले गोपीचंद पडळकर?

“महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्व लोकांना माहिती आहे. रिपाई पक्षांचे तुकडे कुठल्या लांडग्यानं केले? बी के यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? धनगरांना एसटीऐवजी एनटीचा दाखला कुठल्या लांडग्यानं दिला?” असे सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.

गोपीचंद पडळकर अजित पवारांबद्दल काय म्हणाले होते?

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही,” अशी टीका गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar attacks jayant patil over sharad pawar ssa