भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली होती. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आहे, अशा आशयाची टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती. या टीकेनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना समज दिल्याचं बोललं जात होतं. पण आता गोपीचंद पडळकरांना संबंधित वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.

बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. गोपीचंद पडळकरांनी सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा- “भुजबळांचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यांना गुगली…”, शरद पवारांवरील आरोपांवर अनिल देशमुखांची ‘बॅटींग’

संबंधित प्रकरणावर भाष्य करताना वकील असीम सरोदे म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर विधान केलं की, अजित पवार हे लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळेही लांडग्याचं पिल्लू आहे. पण दुसऱ्याची अब्रू नुकसान करणं, अत्यंत चुकीचं आहेय. त्यामुळे बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांच्यातर्फे गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. पडळकरांनी सात दिवसात माफी मागितली नाही किंवा नोटीसला उत्तर दिलं नाही, तर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.”

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर…”; संजय गायकवाडांच्या विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, म्हणाले, “माहितीत तथ्य असेल, तर…”

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.”

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

“मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची भाजपाने फसवणूक केली आहे,” असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरही पडळकरांनी टीकास्र सोडलं आहे. “ही लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत,” असंही पडळकर म्हणाले होते.