वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने राज्य शासनाने पूर्ण अनुदानित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंदर्भात ते उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी वस्ताद लहुजी साळवे यांना संरक्षण दिले. तसेच त्यांनी गावा-गावात कुस्तीसाठी तालमी तयार केल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या नावावे एखादी योजना लागू करण्यासोबतच त्यांच्या नावाने कुस्ती स्पर्थेचे आयोजन करण्याची गरज होती. मात्र, तसे केले गेले नाही. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यामुळे वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करावे. त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.

Story img Loader