विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूपुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट का घेतली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यात पंधारे ते वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट कशासाठी घेतली माहिती नाही. पण, पार्थ पवार यांच्या मनात अस्वस्थता आहे. कारण, त्यांचे बंधू दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विधानसभा सदस्य झाले. ते आता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले असून, बारामती अ‍ॅग्रो सारखी संस्था त्यांच्याकडं आहे. त्यामुळं त्यांच्या मनात खंत असेल.”

“पार्थ पवार यांचा लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला. राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्यात होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

पार्थ पवारांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगड येथे जाऊन भेट घेतली आहे. तेव्हा १५ ते २० मिनिट त्यांच्यात चर्चा झाली. काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar taunt sharad pawar over parth pawar and shambhuraj desai meet ssa