मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या विषयी ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार उदासीन आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उपोषण करण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. उद्या (सोमवारी) सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुंडे उपोषण सुरू करणार आहेत. उपोषणात भाजपचे अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकार कुठल्याच ठाम उपाययोजना राबवित नसून दुष्काळात सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची जनावरे चारा छावण्यांच्या दावणीला बांधली आहेत. त्यांना पुरेसा चारा नाही. तेथेही चारा छावण्यांना अनुदान मिळत नसल्याने छावण्याही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. दुष्काळी स्थितीवर त्वरित उपाययोजना व चारा छावण्यांचे अनुदान तातडीने द्यावे, असे निवेदन भाजपच्या वतीने विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र, त्यावर आयुक्त वा सरकार यांनी काहीही पावले उचलली नाहीत. त्यामुळेच उपोषणावर मुंडे ठाम असल्याचे पक्षाच्या वतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी उपोषणावर खासदार मुंडे ठाम
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या विषयी ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार उदासीन आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उपोषण करण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा
First published on: 08-04-2013 at 01:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde adamant to sit on fast over drought issue