क्रीडा क्षेत्रात मासिक पाळीविषयी मोकळा संवाद घडवून आणता यावा, यासाठी माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अदिती मुटाटकर – आठल्ये यांनी पुढाकार घेतला आहे. सिंपली स्पोर्ट्स या स्टार्टअपबरोबर जोडल्या गेलेल्या अदिती यांनी सिंपली पिरियड्स हा उपक्रम हाती घेतला आहे. खेळाडू मुलींचं प्रशिक्षण, स्पर्धा या त्यांच्या मासिक पाळीचा विचार करून आखल्या जाव्यात. मासिक पाळी व शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी याबाबत मोकळेपणाने चर्चा व्हावी. या उद्देशाने अदिती मुटाटकर यांचं काम सुरू आहे. सिंपली पिरियड्सच्या माध्यमातून केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडू मुलींनाही प्रोत्साहन दिलं जातंय.
‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.