ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यांचा कलाविश्वातील अनोखा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चित्रकलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शिल्पकलेकडे वळला. केवळ शिल्पकलेच्या भावविश्वात न रमता मूर्तीत प्राण ओतण्याचं कसब अरुणाताईंनी जाणलं. पूर्णाकृती शिल्पकलेच्या माध्यमातून देशातच नव्हे जागतिक स्तरावर महिला शिल्पकार म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला.
गर्गे कुटुंबाचा कला वारसा जपताना त्यांना उमगलेली कलेची अनोखी परिभाषा त्यांनी ‘गोष्ट असामान्यांची’च्या या भागात उलगडली आहे. ‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.