महाराष्ट्रातील गाव खेड्यांमध्ये गायल्या जाणाऱ्या भीमगीतांचं डिजिटायझेशन करण्याचा अनोखा प्रकल्प सोमनाथ वाघमारे आणि स्मिता राजमाने यांनी हाती घेतला आहे. “द आंबेडकर एज डिजिटल बुकमोबाईल”च्या माध्यमातून भीमगीतं आणि ती गाणाऱ्या गायकांची माहिती लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळते. सोमनाथ हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन या गायकांची भेट घेतात व ही भीमगीतं रेकॅार्ड करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर डिजिटल बुकमोबाईलमधील ही संपूर्ण माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याची वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. या भीमगीतांना आणि ती गाणाऱ्या गायकांनाही एक ओळख मिळावी. नव्या पिढिला त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने सोमनाथ आणि स्मिताचं काम सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi babasaheb ambedkar songs collection pmw