अहमदनगर जिल्हा, अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी खेडेगावातील राहीबाई सोमा पोपेर यांनी देशी वाणांच्या बियाणांची एक बीज बँक तयार केली आहे. यामध्ये काळा वाल, तांबडा वाल, १९ घेवड्यांच्या जाती, १६ जातीचे भात व अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा देखील समावेश आहे. शंभरहून अधिक देशी वाणांचं संवर्धन करणाऱ्या राहीबाईंना २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्यासाठी देशी बियाणांचा आहारात वापर केला जावा. तसंच शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असा संदेश त्या आपल्या कार्याच्या माध्यमातून देत आहेत. प्रत्येक गावात एक बीज बँक तयार व्हावी हे राहीबाईंचं स्वप्न आहे. जाणून घ्या त्यांचा अनोखा प्रवास…

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi seed mother padmashri rahibai popere who created seed bank in akole district pck