राजेंद्र भट हे गेली ३३ वर्षे बदलापुरच्या बेंडशिळ येथे सेंद्रिय शेती करत आहेत. भटवाडी येथील आपल्या ‘निसर्गमित्र’ फार्ममध्ये त्यांनी ५ एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात विविध अशा १८७ प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. याच लागवडीतून त्यांनी शेतात जैवविविधता तयार केली आहे. परिसंस्था आणि शेती यांच्यातील ताळमेळ कसा साधता येईल? या अनुषंगाने राजेंद्र भट यांचं काम सुरू आहे.
शेती विषयक प्रशिक्षणही ते देतात. शेती शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी वयाची कसलीही अट नसते. त्यामुळे अगदी लहान मुलंही त्यांच्या या निसर्गशाळेत शिकतात. शिवाय परदेशी पाहुण्यांसाठीही निसर्गमित्र फार्म आकर्षणाचा विषय ठरत आहे. राजेंद्र यांच्या कृषी क्षेत्रातील कामासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. शेती करताना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय, पर्याय याबद्दल राजेंद्र भट नेमकं काय बोलले? हे ‘गोष्ट असामान्यांची’मध्ये नक्की पाहा.